रंगाअण्णा वैद्यआदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार सांगली जिल्हा पत्रकार संघाला जाहीर 

भोर,पेण,चंदगड,अंबड,येवला,कुही,शेगाव,  कंधार तालुके ठरले पुरस्कारांचे मानकरी

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाच्या नावांची घोषणा

मुंबई दिनांक 21 ः मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि राज्यातील 354 तालुक्यात शाखा विस्तार असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या मेळाव्यात दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होत असतो.यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळावा सोलापूर जिल्हयात अक्कलकोट येथे 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे.त्यानुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी  2019 च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा आज केली आहे.

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पुरस्कार यंदा सांगली जिल्हा पत्रकार संघाला घोषित कऱण्यात आला आहे.सांगली जिल्हा संघानं पत्रकारांचे मजबुत संघटन उभारण्याबरोबरच पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजनेच्या लढयात मोठाच सहभाग नोंदविला आहे..शिवाय  सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषदेने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ

वसंतराव काणे यांच्या नावाने राज्याच्या प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे आठ तालुक्यांची निवड केली जाते आणि त्यांना सन्मानित करण्यात येते.पत्रकार संघटन,परिषदेच्या उपक्रमातील सहभाग,सामाजिक कार्य आदि गोष्टींचा निवड करताना विचार केला जातो.

पुणे विभाग              ः भोर तालुका पत्रकार संघ ( जिल्हा पुणे )

कोकण विभाग ः       पेण तालुका पत्रकार संघ ( जिल्हा रायगड )

कोल्हापूर विभाग ः    चंदगड तालुका पत्रकार संघ ( कोल्हापूर जिल्हा )

औरंगाबाद विभाग ः अंबड तालुका पत्रकार संघ ( जिल्हा जालना )

लातूर विभाग           कंधार तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नांदेड ) 

नाशिक  विभाग ः    येवला तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नाशिक )

नागपूर विभाग  ः     कुही तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नागपूर )

अमरावती विभाग ः शेगाव तालुका पत्रकार संघ ( जिल्हा बुलढाणा ) 

वरील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,मानपत्र आणि परिषदेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका संघाचे एस.एम.देशमुख,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.मागील सर्व तालुका पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याप्रमाणेच अक्कलकोट मेळावा देखील यशस्वी करायचा असल्याने राज्यातील सर्व तालुका संघांचे पदाधिकारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here