अलिबागकरांसाठी लवकरच बोट अ‍ॅम्ब्यूुूलन्स

अलिबाग आणि परिसरातील अत्यवस्थ रूग्णांवर तातडीने पुढील उपचार करता यावेत यासाठी बोट अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडं पाठविला आहे.या प्रस्तावास केंद्रानं हिरवा कंदिल दाखविला तर अलिबागसह रायगड जिल्हयातील अपघातग्रस्त,अत्यवस्थ रूग्णांसाठी तो मोठाच दिलासा ठरणार आहे.यामुळं हजारो रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

अलिबाग ते मुंबई हे अंतर 97 किलो मिटरचे आहे.मात्र मुंबई-गोवा महामार्गावर अगदी वडखळपासूनच दररोज प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते.या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत मुंबईतील रूग्णालयात पोहचेपर्यंत तीन-चार तास उलटून गेलेले असतात.गोल्डन अवर्समध्येच रूग्णांवर उपचार झाले तर 75 टक्के रूग्ण बरे होऊ शकतात त्यामुळं या रूग्णांना मांडवा ते गेट वे अशा समुद्र मार्गे बोट अ‍ॅम्बुलन्सनं मुंबईला पाठविलं तर त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकतील असं सरकारला वाटतं.या प्रकल्पासाठी पावणे दोन ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित असून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हा निधी उपलब्ध होऊ शकेल असा विश्‍वास या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून बोट भाड्याने घेतली जाणार आहे.

रायगड जिल्हयात सातत्यानं अपघात होत असतात,उपचाराअभावी अनेक रूग्णांना प्राण गमवावे लागतात.बोट अ‍ॅम्ब्युलन्समुळे रूग्णांना तातडीने रूग्णालयात हलविणे शक्य होणार असल्यानं हा प्रकल्प रायगडसाठी उपकारकच ठरणार आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here