मुंबई : शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.

भाजपमध्ये आलेल्या विलास जगताप यांनी राष्ट्रवादीला राम राम केला. तर कोकणात रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे राज्यमंत्री राहिलेले उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शुक्रवारी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला आणि रत्नागिरीची उमेदवारी मिळवली. तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आज राजन तेली यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचा आसरा घेतला आहे.

शिवसेना प्रवेश 
उदय सामंत (राज्यमंत्री, राष्ट्रवादी)
संभाजी पवार (भाजप)
अजिंक्य पाटील ( काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांचे बंधू)
कृष्णकुमार शुक्‍ल (काँग्रेस)
अशोक मिश्रा (काँग्रेस)
सुदर्शन निमकर (राष्ट्रवादी)
पृथ्वीराज पवार (भाजप)

मनसे प्रवेश
डॉ. शुभा राऊळ (शिवसेना)
सुरेश साळोखे (शिवसेना)

भाजप प्रवेश 
राम कदम (मनसे)
डॉ. सुनील देशमुख (काँग्रेसचे माजी नेते)
अनिल बोंडे (अपक्ष आमदार)
संदीप धुर्वे (शक्‍य-राष्ट्रवादी)
सुभाष वानखेडे (शिवसेना)
दिलीप कंदकुर्ते (काँग्रेस)
माणिकराव कोकाटे (काँग्रेस)
चंद्रकांत खाडे (शिवसेना)
प्रताप मेहेरोलिया (शिवसेना)
राजन तेली (आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, आता – भाजप)
विलासराव जगताप (राष्ट्रवादी)

राष्ट्रवादी प्रवेश
बसवराज पाटील-नागराळकर (काँग्रेस)
प्रकाश शेंडगे (भाजप)
बाळासाहेब व्हनमोरे (काँग्रेस)
काशिनाथ मेंगाळ (शिवसेना)

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here