आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची चार-पाच छायाचित्र प्रचलित आहेत.मात्र खाली दिलेलं छायाचित्रच योग्य असून स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी ते प्रमाणित केलेले आहे.बाळशास्त्री वयाच्या 33 व्या वर्षी मृत्यूमुखी पडले.प्रकांड पंडित असलेल्या बाळशास्त्रींच्या चेहर्‍यावर विद्दवत्तेचं तेज विलसत होतं.नियमित सूर्यनमस्कारानं त्यांची प्रकृत्ती देखील ठणठणीत होती.मुकुंद बहुलेकर यांनी काढलेल्या खालील छायाचित्रात या सर्व बाबींचा विचार केला गेला आहे.अन्य छायाचित्रात बाळशास्त्री 65-70 वर्षांचे वाटतात,शरीर कृश झालेले दिसते,ते थकलेलेही दिसतात.बाळशास्त्री असे नव्हते.त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम पत्रकार संघटना आणि पत्रकारांना नम्र विनंती आहे की,येत्या 6 जानेवारील बाळशास्त्रींचे छायाचित्र वापरताना ते चुकीचे वापरले जाणार नाही याची काळजी घ्यावी.खाली दिलेले छायाचित्रचं योग्य असल्याने तेच सर्वांनी ,सर्वत्र वापरावे ही पुनः विनंती मराठी पत्रकार परिषद

LEAVE A REPLY