जयललिता यांचे निधन झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावला होता.हजारो पोलिस कर्मचारी रस्त्यावर बारा-बारा तास डयुटी करीत होते.मात्र सर्व हॉटेल्स बंद असल्याने त्यांची जेवणाची मोठी अडचण होती.अशा स्थितीत हिंदू या दैनिकाने पुढे येत आपल्या कॅन्टिनमध्ये या कर्मचार्यांसाठी मोफत फराळाची व्यवस्था केली होती.एका कर्मचार्याने घेतलेले हे छायाचित्र व्हायरल झाले आहे.–
‘हिंदू’ची माणुसकी
