पाकिस्तान “बघ्याच्या भूमिकेत”

0
891

पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्याकडं दुर्लक्ष कऱणं,गुन्हा दाखलच न करणं,किंवा गुन्हा दाखल झाला तरी आरोपी सुटतील अशी किरकोल कलमं लावणं अशा घटना भारतात वारंवार घडत असतात.त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतरही भारतात हल्लेखोराला शिक्षा झालीय असं उदाहऱणं अभावानंही दिसत नाही.

भारतासारख्या लोकशाही देशात ही स्थिती तर शेजारच्या पाकिस्तानात काय अवस्था असेल याची झलक हामिद मीर यांच्यावरील हल्ल्यानं जगाला बघायला मिळाली आहे.जियो टीव्हीचे पत्रकार अशलेले मीर यांच्यावरील हल्ल्याची अमेरिकेने निंदा केलेली असली तरी पाकिस्तान सरकार मात्र हल्ला होऊन तीन दिवस उलटले तरी साधा गुन्हाही दाखल करायला तयार नाही.जी माहिती काही वेबसाईटसनी दिली आहे त्यानुसार पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातील सरकार अज्ञात आतंकवाद्याविरोधात गुन्हा दाखल करायला इच्छूक नाही.मीर यांच्या कुटुबियांनी हल्लयासाठी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल जहिरू ल इस्लाम यांना जबाबदार धरले आहे.पाकिस्तानचे सूचना मंत्री शरजील मेमन यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले,सर्व बाजुंचा अभ्यास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही.ते म्हणाले,पोलिसांनी हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार केले असून ते लवकरच माध्यमांना देण्यात येईल.
मीर यांच्यावरील हल्ल्यामागे आयएसआय आणि अतिरेकी टोळ्यांचा हात असल्यानं पाकिस्तान सरकार यावर कोही करील असं वाटत नाही.भारतातील काही पत्रकार पाकिस्तानची तळी नेहमीच उचलून धरतात.आज एका पाकिस्तानी पत्रकार मृत्यूूशा झुंज देत असताना हे पत्रकार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत ते समजत नाही.या हल्ल्याचा त्यांनी साधा निषेधही केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here