Tuesday, April 20, 2021

हम है नंबर वन..

निपाणी,अक्कलकोट*,*रत्नागिरी,धुळे,दारव्हा,सावली*,*गेवराई,चाकूर ठरले पुरस्काराचे मानकरी*

*मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर*

मुंबई दि.3 डिसेंबर ः मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची ‘ घोषणा करण्यात आली असून आठ महसूल विभागातून आठ तालुका पत्रकार संघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.स्मृतीचिन्ह,मानपत्र,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. फेब्रुवारीत पालघर जिल्हयात पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला यंदाचा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पत्रकार यापुर्वीच जाहीर झाला आहे.पत्रकारांचे हक्क,संघटन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्‍या राज्यातील आठ तालुका संघांना दरवर्षी परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात.अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या या पुरस्कारांचा वितरण सोहळा देखील परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेसा होत असतो.2020 साठीचे पुरस्कार खालील पत्रकार संघांना जाहीर झाले आहेत.पुणे विभाग ः अक्कलकोट तालुका मराठी पत्रकार संघ ( सोलापूर जिल्हा ) कोल्हापूर विभाग ः निपाणी तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा बेळगाव ) कोकण विभाग ः रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा रत्नागिरी )नाशिक विभाग ः धुळे तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा धुळेःअमरावती विभागः दारव्हा तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा यवतमाळ )नागपूर विभाग ः सावली तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा चंद्रपूर )औरंगाबाद विभाग ः गेवराई तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा बीड )लातूर विभाग ः चाकूर तालुका मराठी पत्रकार संघ ( जिल्हा लातूर ) सीमा भागातील निपाणी तालुका पत्रकार संघाला यंदा प्रथमच परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला असून या संघानं देखील कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केले आहे.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,महिला संघटक जान्हवी पाटील ,जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी वरील सर्व तालुका संघांचे अभिनंदन केले आहे.पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात मान्यवरांच्या हस्ते पालघर जिल्हयात होणार असून त्यासंबंधीची सूचना सर्व तालुका संघांना एक महिना अगोदर दिली जाईल.असे परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

14संपादक अनिल वाघमारे, Anil Mahajan and 12 others4 Comments2 Shares

Related Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,832FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...

पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हे…

अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हेओळखपञ पाहून पञकाराना संचारबंदीतून सवलत द्या - मराठी पञकार परीषदेची मागणी मुंबई (प्रतानीधी) अधिस्वीकृती म्हणजे पञकारीतेचापासपोर्ट नाही राज्यात फक्त 8टक्के पञकारांकडेच...
error: Content is protected !!