हवाय मदतीचा ‘हात’

0
762

kalpakऑक्टोबर 2015 पर्यंत सारं काही व्यवस्थित सुरू होतं.फोटो जर्नालिस्ट म्हणून नगरमधील एका मोठ्या ग्रुपच्या वर्तमानपत्रात नोकरीही आनंदात सुरू होती.मात्र नंतर अचानक उजव्या पायात रक्ताच्या गाठी झाल्याने 4 ऑक्टोबर 2015 रोजी रूबी हॉल पुणे येथे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.पाय गुडघ्याच्या वरपर्यत कापावा लागला.आता सारं काही संपलं आहे.नोकरीही नाही,उत्पन्न नाही.एक स्वाभिमानी पत्रकार आज असहाय्य जीवन जगत आहे.ही कथा आणि व्यथा आहे नगर येथील कल्पक हातवळणे या होतकरू तरूण वृत्तपत्र छायाचित्रकाराची . आज त्याला आपल्या सार्‍यांच्या मदतीची गरज आहे.
काल मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिव मीनाताई मुनोत यांचा फोन आला.नगरमधील पत्रकार हातवळणेला मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.सरकारकडून काही मदत मिळते का बघा अशी त्यांनी विनंती केली.कारण पायावरील शस्त्रक्रियेसाठी साडेतीन लाख रूपये खर्च आला.मात्र विषय एवढ्यावरच थांबला नाही.पाय नाही,फोटोग्राफरची नोकरी यामुळे आर्थिक विवंचना सुरू झाली.त्यातच रक्त पातळ होण्यासाठी स्टाँग गोळ्या सुरू आहेत.त्यामुळे त्यांना जखम न होणारे हायड्रोलिक पाय बसविण्यास सांगितले आहे.त्यासाठी त्यांना आणखी तीन लाख तेरा हजार रूपये खर्च येणार आहे.वृत्तपत्र छायाचित्रकार असलेल्या हातवळणेला एवढी रक्कम जमा करणं केवळ अशक्य आहे.त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या एका पत्रकार मित्राला मदत केली पाहिजे.मराठी पत्रकार परिषदेचा पत्रकार आरोग्य सेवा कक्ष त्यासाठी मदत कऱणारच आहे.व्यक्तीगत पातळीवर ज्यांना शक्य आहे अशा पत्रकारा मित्रांनी हातवळणेला मदतीचा हात दिला पाहिजे अशी विनंती आहे.स्वाभिमानी कल्पकचं सांगणं होतं की,माझं दुःख फेसबुकवर टाकू नका,मात्र कल्पकला मदतीची गरज आहे.ती देखील तातडीनं.त्यामुळं त्याची इच्छा नसतानाही त्याचं हे दुःख सर्वासमोर मांडावं लागत आहे.एखादी एनजीओ त्याला पाय मिळवून देण्यासाठी यातून पुढं आली तर कल्पक पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहू शकेल.

कल्पक हातवळणेचा मोबाईल नंबर असा आहे.9158881554

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here