बेलग्रेड : अनेक कवींनी स्त्रीच्या सौंदर्याचं भरभरुन कौतुक केल्याचं आपण वाचलं असेल. पण हेच सौंदर्य काहींसाठी शिक्षेचं कारण बनू शकतं. सर्बियाच्या एका महिला स्पोर्ट रिपोर्टरबाबत ही घटना घटली. 25 वर्षांची कॅटरिना स्रेकोविचवर तिच्या सौंदर्यामुळे फुटबॉल ग्राऊंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
स्रेकोविचविरोधात एका फुटबॉल संघाच्या खेळाडूंनी तक्रार दाखल केली. कॅटरिनाच्या सौंदर्यामुळे आम्ही आमच्या खेळावर पूर्णत: लक्ष केंद्रीत करु शकत नाही.