मुंबईः परभणी जिल्हयातील सेलू येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर यांना काही अज्ञात व्यक्तींनी थोडयावेळापुर्वीच जबर मारहाण केली.
ते आपल्या घरून ऑफीसकडे जात असताना दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी रोखली आणि लाथा-बुक्क्यानी त्यांना मारहाण करायला सुरूवात केली.हल्लयाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी डासाळकर यांनी सातत्यानं नगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात बातम्या लावल्या आहेत.त्यातून काहींवर कारवाई देखील झाली आहे.या व्देषातूनच ही मारहाण झाली असावी अशी शक्यता डासाळकर यांनी व्यक्त केली आहे.डासाळकर सध्या पोलीस तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

काही दिवसांपुर्वीच येलदरी येथील पत्रकाराच्या घरावर रॉकेल ओतून ते पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्यातील आरोपी अद्याप सापडलेले नसतानाच पुन्हा हा प्रकार घडला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद या हल्लयाचा निषेध करीत आहे.
7 एप्रिल 2017 रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला.तो मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठविला गेला मात्र तो दिल्लीतच पडून असल्याने संमत झालेल्या विधेयकाचे अद्याप कायद्यात रूपांतर झाले नाही.सरकारनं या विषय दुर्लक्षित केलेला असल्याने राज्यातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here