सेक्युलर ब्लॉगर्स… सावधान

0
911
पत्रकार,साहित्यिक,ब्लॉगर हे नेहमीच कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टवर असतात.महाराष्ट्रात काही पत्रकारांना जिवे मारण्यच्या धमक्या आलेल्या असतानाच बांगला देशातील एका इस्लामी कंटरपंथीय संघटनेने जगभरातील सेक्युलर ब्लॉगर्सची एक हिटलिस्टच तयार केल्याची बातमी आली आहे.या हिटलिस्टमध्ये अमेरिका,ब्रिटन,युरोपमधील ब्लॉगर्सचा समावेश आहे.ब्रिटनमधील डेली मेल या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.जगभरात जेवढे सेक्युलर ब्लॉगर्स आहेत त्यांना शोधा आणि ठार मारा असा फतवाच इस्लामी कंट्टरवादी संघटनेनं काढला आहे.
अन्सारूल्लाह बांग्ला टीम असं या कंटरपंथीय इस्लामी संघटनेचं नाव आहे.जगभरातील वीस ब्लॉगर्सची हिटलिस्ट या संघटनेनं तयार केली आहे.या वर्षी बांगला देशातील चार ब्ला्रॅगर्सची हत्त्या कऱण्यात आलेली असल्यानं ही संघटना केवळ फतवे काढून थांबत नसल्याचं समोर आलंय.
ब्लॉगर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम कऱणारे थॉमस ह्यूग्स यांनी या घटनेचा निषेध केला असून हा लेखक आणि ब्लॉगर्स समुदायावरचा हल्ला असल्याचे त्यानी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here