पत्रकारांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर सुप्रीम कोर्टाचे शिक्‍कामोर्तब

पत्रकारांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले असून, उत्साहाच्या भरात केलेल्या चुकीच्या वार्तांकनाच्या काही घटनांमुळे कायमच पत्रकारांना जबाबदार धरले जाऊ नये, अशी टिपणी केली आहे. बिहारच्या माजी मंत्री परवीन अमानुल्ला यांची कन्या रहमत फातिमा यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि राघव बहल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अबु्रनुकसान खटल्याच्या अपील याचिकेवरील सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिपणी केली आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या.चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने याचिका फेटाळताना म्हटले आहे की, तुम्ही पत्रकारांचे स्वातंत्र्य मान्य करायला हवे. जरी काहीवेळा चुकीचे वार्तांकन होत असले, तरी त्यासाठी त्यांना कायम जबाबदार धरू नका.

दैनिक पुढारीवरून साभार

10 COMMENTS

  1. अधिस्वाकृती प्रस्ताव सादर केला पण, कागदपत्रे तफावत असे पत्र मिळाले, त्यावर मी अजित जगताप, संजय दस्तुरे, भद्रेश भाटे व शिवाजीराव जगताप या सातारा जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांनी अपील केले त्याला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. कोणतीही कारवाई करण्यात आली नाही
    कृपया या बाबत शक्य झाले तर सहकार्य करावे

    या ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे त्याबद्दल क्षमस्व।।।
    आपला
    अजित जगताप

    • अपिलाची पत्रं माझ्याकडं मेल करा..येत्या 10 आणि 11 तारखेला बैठक आहे.मी विषय मांडतो.smdeshmukh13@gmail.com

  2. अधिस्विकृती मिळण्याचा क्राईट एरिया काय आहे.
    आपला
    विवेक शिंदे

    • आपल्या जिल्हयातील जिल्हा माहिती अधिकार्‍यांशी संपर्क साधावा..त्यांच्याकडं अर्ज उपलब्ध आहेत..

  3. How can take akredetion no . I am Editor of Ahmednagar Express.Ahmednagar 414001
    My Mob.No.9270304333 or 7385181806

  4. पत्रकार यांच्या वर होणाऱ्या खोट्या गुन्ह्या बाबत ,तसेच पत्रकारण वर होनाऱ्या अंन्याया बाबत आपली भूमिका काय आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here