सुडकोलीच्या स्मारकाला भेट 

0
755

बाळाजी विश्‍वनाथ भट,कोन्होजी राजे ,विनोबा भावे,भाई कोतवाल,साहित्यिक वामन मल्हार जोशी,स्वामी केवलांनंद सरस्वती,बासुदेव बळवंत फडके,दत्तो वामन पोतदार,काळकर्ते शि.म.परांजपे,मालतीबाई बेडेकर,इतिहासाचार्य वि.का.राजवाडे,र.वा.दिघे,माझा प्रवासकार विष्पुभट गोडसे,शिल्पकार विनायक  पांडुरंग  करमरकर,पांडुरंगशास्त्रीआठवले,सी.डी.देशमुख,प्रभाकरकार भाऊ महाजन,नरवीर तानाजी मालुसरे,समाजसुधारक विष्णुबुवा ब्रम्हचारी यांच्यासारख्या अनेक महापुरूषांनी रायगडमध्ये जन्म घेतला पण आज स्थिती अशीय की हे महापुरूष त्यांच्याच गावात अनोळखी ठरले आहेत.त्यांचं स्मरण ना सरकारला आहे ना गावकर्‍यांना.अशा स्थितीत या महापुरूषांच्या गावाच्या वेशीवर त्यांचं छोटसं स्मारक उभं करायचं रायगड प्रेस क्लबनं ठरविलं होतं.या संकल्पनेतलं पहिलं स्मारक रोहा तालुक्यातील सुडकोली इथं उभारलं गेलं आहे.’धर्म हा परिवर्तनवादी असला पाहिजे’ असा विचार मांडणारे स्वामी केवलानंद सरस्वती याचं हे जन्मस्थळ आहे.वाई येथे सुरू केलेल्या प्राज्ञ पाठशाळेचे ते संस्थापक होते,अनेक ग्रंथाचे लेखन करणार्‍या स्वामीचं मुळ नाव नारायण सदाशिव मराठे असं होतं.ज्या सुडकोलीत जे जन्मले त्या गावात स्वामींची कोणालाच कसलीही माहिती नाही.त्यामुळं रोहा प्रेस क्लबच्या पुढाकारानं त्याचं छोटसं स्मारक सुडकोलीच्या वेशीवर उभं केलं गेलं.2009 मध्ये हे स्मारक उभारलं गेलं.मात्र ते खराब झालं होतं.त्याला नव्यानं रंगरंगोटी कऱण्यात आल्यानंतर परवा रोह्याहून अलिबागला जाताना मुद्दाम या स्मारकाला भेट देण्याचा योग आला.आनंद वाटलां.यावेळी माझ्य समवेत किरण नाईक,मलिंद अष्टीवकर आणि अन्य पदाधिकारी होते.अशी 25 स्मारकं रायगडात उभी करायची होती.मात्र स्वामी केवलानंद आणि भाई कोतवाल यांचीच स्मारक उभारणं शक्य झालं.रायगड प्रेस क्लबच्या माझ्या मित्रांना विनंती की,अन्य महापुरूषांची स्मारकं उभारत आली तर नक्की प्रयत्न करावा.कारण कोकणचा हा ठेवा जनत केला पाहिजे आणि त्यांची माहिती नव्या पिढीलाही झालीच पाहिजे.—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here