सामनाच्या कार्यालयावर हल्ले

0
699

मुंबई, दि. 27-  शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. आज दुपारी ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे.

दोन अज्ञात बाइकस्वारांनी सामनाच्या कार्यालयावर दगडफेक आणि शाई फेकल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावरही अज्ञातांनी दगडफेक केली.

राज्यभर निघत असणार्‍या मराठा क्रांती मूक मोर्चावर सोमवारी ‘सामना’तून विडंबनात्मक व्यंगचित्र छापून आलं होतं.( लोकमतवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here