मुंबईतील सामना कार्यालयावर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून सामनातील अग्रलेखाबद्दल निषेध केला.यावेळी सामनाच्या अंकाची होळी केली गेली.यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.सामना कार्यालयासमोर सध्या तणाव असून रॅपिड ऍकश्न फोर्सला पाच़ारण करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून राज्यात जातीय तणाव वाढल्याचा आरोप केला होता.पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेणारा अग्रलेख आजच्या सामनात बेताल बडबड या मथळ्याखाली प्रसिध्द झाला आहे.या अग्रलेखात पवारांची तुलना पाकिस्तानच्या हाफीत सईदबरोबर केल्यानं राष्ट्रवादींची माथी भडकली आणि ते सामनावर चालून गेले.

LEAVE A REPLY