साताऱ्यात आरोग्य तपासणी

0
750

सातारा, दि. 9 : मराठी पत्रकार परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तपासणी शिबीरामध्ये तब्बल 277 पत्रकारांनी आरोग्य तपासणी करुन घेतली.

मराठी पत्रकार परिषदेचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्ह्यातील पत्रकारांचे पहिल्यांदाच मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबीरास प्रारंभ झाला.

यावेळी डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने हा उपक्रम राबविण्याची संधी आम्हाला दिली हा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा बहुमान आहे. समाजाच्या आरोग्याची  काळजी वाहणा-या पत्रकारांचे आरोग्य तपासण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली. सातारची पत्रकारिता राज्यात नावाजलेली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या  गौरवशाली वाटचालीत सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे योगदान आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी तपासणी शिबीर राबवताना  समाधान होत आहे. पत्रकारांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी जिल्हा पत्रकार संघाने राबवलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

हरीष पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील आमच्या सहका-यांच्या आरोग्याची तपासणी करुन सातारची पत्रकारीता सामाजिक आरोग्याची काळजी वाहण्यासाठी आणखी सक्षम करण्याचा हा प्रयत्न होता. जिल्ह्यातील पत्रकारांनी या प्रयत्नाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भविष्य काळातही जिल्हा संघामार्फत पत्रकार  हिताचे निर्णय घेतले जातील. दि. 6 जानेवारी या पत्रकार दिनापर्यंत जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सभासदांना सभासद कार्ड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमार्फत मिळतील. तालुका पत्रकार संघांनीही वर्षभरात परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रमांचे आयोजन करावे, त्याला जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्य राहील.

शरद काटकर म्हणाले, पत्रकार अनेकदा अनेकांचे रक्तदाब व शुगर वाढवत असतात मात्र, समाजाचे प्रश्न सोडवताना पत्रकार स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त ही संधी आम्हाला मिळाली. भविष्यातही एकजुटीने आमची वाटचाल राहील. श्रीकांत कात्रे म्हणाले, पत्रकारांसाठी प्रथमच असा उपक्रम आयोजित केला जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्षच असते. कायम बातमीच्या शोधात असलेले पत्रकार स्वतःच्या शारीरिक तपासण्यांकडे दुर्लक्ष करतात. जिल्हा पत्रकार संघाने मात्र हा चांगला पायंडा पाडला.

विनोद कुलकर्णी म्हणाले, जिल्हा पत्रकार संघाने गुणवंत पाल्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर दुसरा मोठा उपक्रम यशस्वी करुन दाखवला. साता-यातील सर्व पत्रकार या शिबीरास उपस्थित राहिले हे जिल्हा पत्रकार संघाचे मोठे यश आहे. भविष्यातही जिल्हा पत्रकार संघाच्या उपक्रमांना सातारा शहरातील पत्रकार भरीव सहकार्य करतील. डॉ. सुधीर बक्षी यांनी सूत्रसंचलन केले. अरूण देशमुख यांनी आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर तपासणी शिबीरास प्रारंभ झाला. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सुमारे 277 पत्रकारांनी आरोग्य तपासणी केली. रक्तदाब, हिमोग्लोबीन, मधुमेह, ईसीजी, त्वचारोग, कान, नाक, घसा, डोळे यासह अनेक शारिरिक तपासणी मोफत करण्यात आल्या.

यावेळी डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. आर. के. यादव,  डॉ.  एन. डी. खोत, डॉ. आर.जी. काटकर, डॉ. टी. जी. माने, डॉ.  सुभाष घेवारी, डॉ.  एस टी कदम, डॉ.  उमेश पाटील, डॉ.  जितेंद्र पाटील, डॉ. सी. पी. काटकर, डॉ. विजी कु-हाडे, डॉ. अशोक शिंदे, डॉ.  सी. डी. कारंजकर, डॉ.  शितल फडतरे, डॉ. सचिन विभूते, डॉ.  समीर घोलप, डॉ.  सर्यकांत सातपुते, डॉ.  शारदा भास्कर, डॉ.  शुभांगी मोरे, डॉ.  मेघा सुर्यवंशी, डॉ.  टिकोळे, डॉ. वाघमारे, डॉ.  विजया लांडगे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ.  राहूल भोसले, डॉ. व्ही. जी. निकम, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. एन.ए. मुळे, डॉ.  एन.पी. मोहिते, डॉ.  ए. के. कर्णे, डॉ. गणेश लावंड, डॉ.  एम. एस. डेरे, डॉ.व्यंकटेश गौर, रामचंद्र दुधाळकर, सचिन थिटे, ए. व्ही. तपासे, सी. के. धायगुडे, जी. के. गायकवाड, अमृता जगताप, एस. आर. पवार यांनी तपासणी शिबीरास सहकार्य केले.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सचिन जवळकोटे, उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, दत्ता मर्ढेकर, सदस्य दीपक दीक्षित, साहिल शहा, नागनाथ डोंबे, सुरेश पार्टे, शशिकांत जाधव, अजय माळवे, अरूण देशमुख, इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनचे कार्याध्यक्ष ओंकार कदम, ज्येष्ठ पत्रकार शंकरराव जाधव, शरद महाजनी, शंकर पाटील, तालुका पत्रकार संघांचे पदाधिकारी, सातारा शहर पत्रकार संघाचे सदस्य व पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here