आमिर खान काल सातार्यात होता.समाजसेवक म्हणवून घेणार्या आमिर खानच्या संरक्षणासाठी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला होता.जलशिवार बैठकीसाठी आलेल्या आमिरच्या दौर्याच्या वेळेस स्थानिक पत्रकारांना अत्यंत अपमानस्पद वागणूक देण्यात आली.त्याचा पत्रकारांनी निषेध केला आणि जलशिवारच्या सदस्य पदांचे राजीनामे देण्याची घोषणाही कालच केली होती.सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक सुजित अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली आणि आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.हरिष पाटणे आणि तयांच्या सहकार्यांनी दाखविलेल्या बाणेदारपणाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.- सातारकर पत्रकारांचा बाणेदारपणा
अमीर खान चा दौऱ्या दरम्यान सहकारी पत्रकारांना मिळालेली वागणूक व जलयुक्त शिवार बैठकांना निमंत्रित न करण्याच्या मुद्द्यावरून आज समिती सदस्यांसह अनेक पत्रकार मित्र जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना भेटले। पत्रकारांनी कालच्या प्रकाराबाबत तीव्र निषेध केला ।समिती सदस्यांनी आपले राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले।सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामात पत्रकारांनी दिलेल्या योगदानाची कबुली जिल्हाधिकारी यांनी दिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला ।कालच्या प्रकाराबाबत झालेल्या विसंवादाचीही कबुली त्यांनी दिली। यापुढे तुमच्यात व माझ्यात कोणताही अधिकारी वा कथित समाजसेवकाचा आडपडदा राहणार नाही असे हि त्यांनी सांगितले। तरीही राजीनाम्यांवर आम्ही ठाम राहिलो तेव्हा आम्ही दिलेल्या पत्रावर त्यांनी या वर्षीचा राजीनामा मंजूर करून पुढच्या वर्षी साठी फेरनिवड करत आहोत असे सांगितले।त्याला अद्याप आम्ही मान्यता दिलेली नाही । सर्वच पत्रकारांचा सन्मान राखला जाणार असेल तर आम्ही विचार करू असे सांगितले आहे। सोबत जिल्हाधिकारी यांना दिलेले राजीनामा पत्र व त्यांनी लिहिलेला शेरा।