सातव्या मजल्यावरून 
पडून पत्रकाराचा मृत्यू

मुंबईः राज्यभर पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज मुंबईतील गोरेगाव भागातील सिध्दार्थ नगरमध्ये एका इंग्रजी दैनिकातील पत्रकाराचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.मात्र हा अपघात आहे की आत्महत्या हे स्पष्ट झालेलं नाही.आदर्श मित्रा असे मृत पत्रकाराचे नाव आहे.
इंग्रजी मिडियाशी संबंधित आदर्श मिश्रा दररोज मॉर्निंग वॉकसाठी ते राहात असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर जात असत.आज ही नेहमीप्रमाणे ते गच्चीवर गेेले मात्र सव्वा दहाच्या सुमारास गच्चीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला.आदर्श मिश्रा यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY