आगळा-वेगळा पत्रकार दिन

0
1183

आम्ही भाग्यवान खरंच.. कारण आई वडिलांचं छत्र आजही आमच्या डोक्यावर आहे.. त्यामुळं आम्ही निधाॅसथ असतो.. आमच्या आई वडिलांची जन्म तारीख नक्की माहिती नाही.. तरीही वडिल ८७ च्या पुढे आणि आई ८२ च्या घरात असावेत असा अंदाज आहे.. त्यामुळं आई वडिलांचा सहस्त्रचंद़ दश॓न सोहळा करावा अशी बरयाच दिवसांची इच्छा होती पण वडिलांची त्यासाठी तयारी नसायची.. मुलाच्या लग्नासाठी आई वडील पुण्याला आले आणि आमचे धाकटे बंधू दिलीप देशमुख यांनी वडिलांना तयार केले.. घरातील सुनांनी मग त्यासाठी पुढाकार घेतला.. अन काल पत्रकार दिनाचं औचित्यसाधून केडगाव नजिक निसर्गरम्य बोरमलनाथ येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत सहस्त्रचंद़ दश॓न सोहळा पार पडला.. आई वडिलांची ग़थ तुला केली गेली.. ही सारी मौलिक पुस्तकं नंतर स्थानिक मुलांना भेट देण्यात आली..
वडिल जमिनदार असले तरी विचारानं डावीकडे झुकलेले.. सामाजिक चळवळीतले सक़ीय कायॅकतेॅ.. राजकारणाची मनस्वी आवड असलेल्या वडिलांनी पन्नास साठ वषेॅ गावचं राजकारण केलं.. आई दोन वेळा सरपंच झाली.. या काळात गावच्या विकासाची अनेक कामं भाऊंनी केली . आई सलग ४० वर्षे ग्रामपंचायत सदस्य होती.. सवत: वडिलही काही वषेॅ ग्रामपंचायत सदस्य होते.. स्वभावाने कठोर आणि वृत्तीने बेडर असलेल्या भाऊंच्या आयुष्यात आलेले अनेक चढउतार आम्ही पाहिले, प्रसंगी अनुभवलेली…. पण प्रत्येकवेळी त्यांनी परिस्थितीशी खंबीरपणे चार हात केले..संकटं आल्यानं वडिल कधी हतबल होऊन बसलेत, कधी परिस्थितीला शरण गेलेत असं आम्हाला दिसलं नाही..कधी त्यांनी मनाविरुद्ध तडजोडीही केल्या नाहीत.. सुख दुःखाचे अनेक प्रसंग आले पण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या डोळ्यात आम्ही कधी अश्रू ही पाहिले नाहीत . काल मात्रं आई भाऊंचा सत्कार होत असताना, ग्रंथ तुला होत असताना कणखर भाऊंना आपले अश्रू आवरणे अशक्य झाले होते.. ते कमालीचे भाऊक झाल्याचं आम्ही पहिल्यांदाच पहात होतो.. आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू वहात होते.. आम्ही सारी भावंडं आज सुस्थितीत आहोत.. आपआपल्या क्षेत्रात निष्ठेने आणि आनंदानं काम करतो आहोत.. नातवंडं उच्च शिक्षित झालीत.. विविध ठिकाणी कायॅरत आहेत.. त्याचं समाधानही आई भाऊंच्या डोळ्यात दिसत होतं..
अशा प्रकारे कालचा आमचा पत्रकार दिन आमच्यासाठी आगळा वेगळा आणि आमच्या आयुष्यातील सवा॓त मोठा आनंदाचा दिवस ठरला.. आम्ही बोरमलनाथ येथे आहोत हे कळल्यावर परिसरातील दहा पंधरा पत्रकार मित्र भेटायला आले.. त्यांनीही आई – भाऊंचा सत्कार केला..
आई आणि भाऊ दोघेही शतायुषी होओत आणि त्यांचं आयुरारोग्य उत्तम राहावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here