सर्व पत्रकार मित्रांचे आभार.

0
1228

सर्व पत्रकार मित्रांचे आभार.

अगदी मनापासून आभार.

कालचं आंदोलन यशस्वी करताना आपण जी एकजूट दाखविलीत,
जो, निर्धार दाखविलात त्याला तोड नाही.
एकाच दिवशी राज्यातील तीन प्रमुख नेत्यांना पंधरा हजारांवर एसएमएस,
एकाच वेळी राज्यातील 36 जिल्हयात आणि 354 पैकी 337 तालुक्यात घंटानाद आंदोलन
यशस्वी होणं ही एतिहासिक घटना आहे असं मला वाटतं.
हे यश मिखवताना कुठंही,कसलाही बेसूर नाही,संघटनांत्मक वादावाद नाहीत,
सारे पत्रकार संघटनांचे बॅनर्स बाजूला ठेऊन केवळ संरक्षण कायद्यासाठी एकत्र येतात
आणि बलदंड अशा सत्तेला धक्का देतात हे सारं स्वप्नवत वाटतं.
हे आपण करून दाखविलतं.त्यामुळं कालचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस ठरला.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांना एसएमएसचे असे दणके बसले की,सकाळी दहा नंतर त्यांचे फोन
हँग झाले आणि बंद पडले.हे मी म्हणत नाहीत या तीघांनीच शंभरांवर पत्रकारांसमोर मुंबईत हे सत्य सागितलं.
एसएमएसच्या माध्यमातून पत्रकारांनी व्यक्त केलेल्या संतापाची दखल सर्वांनाच ध्यावी लागली.
राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले,पत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात झाला पाहिजे.
धनंजय मुंडे म्हणाले,सरकारनं कायदा करावा यासाठी मी लक्ष्यवेधी आणत आहे.
रामराजे निंबाळकरांनी,हरिभाऊ बागडे यांनीही हाच धागा पकडत पत्रकारांचे प्रश्‍न सोडविले गेले पाहिजेत असं सांगितलं
मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपण कायद्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करीत असल्याचं सागांवं लागलं.
त्यामुळं आता काही तरी निष्पण्ण होईल हे नक्की.
हे सारं घडलंय आपल्यामुळं
आपण दाखविलेल्या एकजुटीमुळं..
मी,आम्ही निमित्तमात्र आहोत..
कायदा होईपर्यंत,पेन्शनचा विषय मार्गी लागेपर्यत आणि पुढे नेहमीसाठीच
ही एकजूट आपणास कायम ठेवायची आहे..

आमच्या,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या हाकेला ओ देत आम्हाला आपण जी शक्ती दिलीत त्याबद्दल राज्यातील तमाम पत्रकार मित्रांना सॅल्युट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here