सर्व जिल्हा संघांसाठी निवेदन

0
642
मराठी  पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुकांच्या दृष्टीने याद्या बनविण्याचे काम सुरू झालेले आहे.आपणासर्वांना ज्ञात आहे की,यंदाच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं घेतल्या जाणार आहेत.आपल्या मोबाईलवरून आपण पसंतीच्या उमेदवारांना मतदान करू शकणार आहात.अनेक जिल्हा संघांनी अद्याप आपल्या मतदार याद्या पाठविलेल्या नाहीत.सर्व जिल्हा संघांना पुनश्‍च विनंती करण्यात येत आहे की,आपल्या मतदार याद्या उशिरात उशिरा 5 मार्च पर्यंत परिषदेच्या कार्यालयात वर्गणीसह जमा कराव्यात.शंभर रूपये वार्षिक वर्गणी आहे.दोन वर्षांची 200 रूपये आणि संलग्नता शुल्क 500 रूपये या प्रमाणे वर्गणी पाठवावी.यादी पाठवताना सदस्यांचा व्हॉटसअ‍ॅप नंबर आवश्यक आहे.व्हॉटसअ‍ॅप नंबर नसल्यानं एखादया सदस्याला मतदानात भाग घेता आला नाही तर त्याची जबाबदारी परिषदेची असणार नाही.शिवाय 5 मार्च पर्यंत आपल्या याद्या आल्या नाहीत आणि त्यामुळं एखादया जिल्हयातील सदस्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता आला नाही तर त्याचीही जबाबदारी परिषदेची नसेल.परिषदेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन निवडणुका होत असल्यानं त्यासाठीच्या तयारीला लागणारा वेळ लक्षात घेऊन तातडीनं आपल्या याद्या,फोन क्रमांकासह पाठवाव्यात ही विनंती.
कळावे
आपला
यशवंत पवार
 सरचिटणीस
 मराठी पत्रकार परिषद.मुंबई-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here