पत्रकारांवर होणारे हल्ले ,कामावर असताना होणारे अपघात,कामाच्या तणावामुळे उद्वभवणाऱ्या अनेकविध व्याधींपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने पत्रकारांसाठी अपघात आणि मेडिक्लेम विमा योजना राबवावी अशी मागणी पत्रकार गेली दहा-पंधरा वर्षे करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने आता पोलिस पाटलांचा विमा काढण्याची घोषणा केली आहे.गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल पैठण येथे आयोजित राज्य पोलिस पाटील सघटनेच्या अधिवेशनात बोलताना ,राज्य सरकार प्रत्येक पोलिस पाटलांचा दोन लाख रूपयांचा विमा काढेल अशी घोषणा केली.सेवा बजावताना अपंगत्व,आजार किंवा मृत्यू आल्यास त्यांना मदत करू तसेच वारसांना शासकीय नोकरीत साामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील अशीीही घोषणा त्यांनी केली आहे.गृहमंत्र्यांच्या या घोषणेला विरोध करण्याचे कारण नाही पण मग पत्रकारांच्या याच मागणीकडे सरकार का दुर्लक्ष करीत आहे याचेही उत्तर मिळाले पाहिजे.देशातील किमान सहा राज्यांनी पत्रकार विमा योजना सुरू केलेली आङे.महाराष्ट्र सरकार का टाळाटाळ करीत आहे हे समजत नाही.