सबसे तेज,सबसे पहले,सबसे आगे असे दावे करणारे सर्व चॅनल्सचे हे दावे किती फोल आहेत हे एका बातमीनं समोर आलंय.शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली.राज्यातील दोन महत्वाचे राजकीय नेते राज्याचं भवितव्य ठरविण्यासाठी एकत्र येतात,चर्चा करतात आणि दहा दिवस झाले तरी मिडियाला त्याची खबर देखील नाही ही गंमत आहे.प्रश्न पडतो की,आमची शोध पत्रकारिता गेली कुठे ?शरद पवार यांनी स्वतः जाहीर करेपर्यंत आम्हाला जर या भेटीचा थांगपत्ता लागत नसेल तर आमच्यामध्ये सुधारणेला किती वाव आहे याची कल्पना येते.’आम्ही भेटलो’ असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी नेमके या बैठकीत काय चर्चा झाली हे काही कळले नाही.’आमच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही’ असं शरद पवार सांगतात,मग काय हे दोन महत्वाचे नेते हवापाण्याच्या गप्पा करण्यासाठी एकत्र आले होते काय? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.सबसे पहलेवाल्यांना याचा विचार करावा लागणार आहे.आपल्या शहरात एखादी भेट घडते आणि त्याचा पत्ताही आपल्याला लागत नसेल तर सबसे पहले म्हणणं मोठा विनोदच ठरतो.
दस दिन के बाद..सबसे पहले…
