“संस्थानिका”कडं आहेत म्हणून…

  0
  829

  मतदारांना पैसे वाटताना पुण्यात तिघांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडले.हे तिघेही भारती विद्यापीठातील वरिष्ठ पदांवरचे अधिकारी आहेत . डॉक्टर आहेत. “उच्चविद्याविभूषित व्यक्तींनी लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्याचे काम करावे काय?  असा प्रश्न विचारत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाणही केली .मला वाटतं त्यांना मारहाण करण्यात पुरूषार्थ नाही.याचं कारण भारती विद्यापीठच काय पण पुढाऱ्यांच्या ताब्यातील सस्थेतल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला निवडणुकांच्या कामाला जुंपले जाते कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या बायकांनाही स्लिपा वाटणे किंवा मालकिनबाईंबरोबर प्रचार दौरा करण्यास भाग पाडले जाते.हे सर्वत्र घडते.कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा इलाज नसतो.त्याला स्वाभिमानापेक्षा नोकरी महत्वाची असते आणि म्हणूनच तो  “पैसे वाटप करा”  असा आदेश आला तर आपण व्हाईस प्रिन्सिपल आहोत हे विसरून पैसे वाटायला घराच्या बाहेर पडतो.नोकरीच्या बदल्यात हे त्याला करावं लागतं.बर यात गंमत अशी की,उद्या कोणी अडचणीत आलंच तर मालक त्याला वाऱ्यावर सोडतो. “आम्ही तुम्हाला नोकरी दिलीय त्याबदल्यात तुम्हाला सारं सहन करावं लागेल”  अशीच यामागची भावना असते..विश्वजित कदम म्हणतात, “झालेल्या प्रकाराशी माझा संबंध नाही.” ही भूमिका स्टाफला वापरून फेकणारी आहे. तुमचा संबंध नसेल तर ही मंडळी तुमच्या कॉलेजची आहे ना आणि ती तुमचे पाम्पेलट घेऊन पैसे कोणासाठी वाटत होती? . “मनसेनंच त्यांच्या हातात पैसे दिले आणि नंतर त्यांना पकडलं” .हे राजकीय बचावाचं उत्तर झालं.वस्तुस्थिती साऱ्यांनाच मिाहती आहे.मला वाटतं ज्या डॉक्टरांनी पैसे वाटले ,दोष त्यांचा नाही. “पापी पेटका सवाल आहे” .म्हणूनच कारवाई व्हायचीच असेल तर मास्टरमाईंडवरच झाली पाहिजे.
  कोणतीही संस्था काढताना हल्ली समाजसेवेचा हेतू नसतो.पैसा कमावणं आणि संस्थेलील माणसं निवडणुकीत राबायला मिळणं हे दोन हेतू डोळ्यासमोर असतात. कारण हक्काची आणि विश्वासाची माणसं निवडणूक काळात मिळत नाहीत.दावणीला बांधलेली माणसं त्यासाठी उपयुक्त ठरतात.त्यामुळंच राहूल गांधी यांच्या सभेची गर्दी वाढवायची असो,रॅलीत सहभागी व्हायचं असो की,पैसे वाटायचे असोत,भारती विद्यापीठाची माणसंच सर्वत्र दिसतात.त्यात शिपायांपासून वरच्या पदांपर्यत सारेच असतात.हे पुण्यातच चालंतय असं नाही.जे जे उमेदवार संस्थानिक आहेत ,तिथं तिथं हेच सुरूय. फरक एवढाच आहे की,जे पकडले जातात,ते उघडे पडतात,जे पकडले जात नाहीत त्यंाची झाकली मुठ असते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here