अहमदनगर येथील सकाळचे निवासी संपादक श्री.बाळ बोठे यांना रस्त्यावर अडवून काही समाजकंटकांनी अर्वाच्य शिविगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यांनी याबाबतची रितसर तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
सकाळच्या नगर आवृत्तीत गेली पंधरा दिवस तालुकानिहावय जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंध्याच्या विरोधात लेखमाला प्रसिध्द होत आहे.त्यामुळे काही लोकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले.त्यांनीच बोठे यांना धमकी दिली आहे.काल रात्री आपले काम आटोपून बोठे घरी जात असताना त्याना काही लोकांनी अडवून तुम्ही सुरू केलेली लेखमाला बंद करा अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली.जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच डीवायएसपी हे चांगले अधिकारी असून त्यांच्याविरोधात छापून आलेले अवाक्षरही आम्ही खपवून घेणार नाही असेही हे गुंड बोठेंना सांगत होते.आज बाळ बोठे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून नगर जिल्हयातील पत्रकार ंसंघटना,सामाजिक संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या घटनेचा निषेध केला असून गृहराज्य मंत्री राम शिंदे हे नगरचे असून त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि धमक्या देणाऱ्यांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.