संपादकाच्या घराला बुलडोझर लावणार

0
732

विरोधात बातम्या दिल्या म्हणून दैनिक पार्श्‍वभूमीचे कार्यालय

आणि संपादकांच्या घराला बुलडोझर लावणार 

बीडचे भूतपूर्व जिल्हाधिकारी केंद्रेकर यांचं कौतूक करणं आणि जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर टीका करणं बीडचे दैनिक पार्श्‍वभूमीला चांगलंच महागात पडणार असं दिसतंय.पार्श्‍वभूमी दैनिकाला एक नोटीस बजावण्यात आली दैनिकाचे कार्यालय तसेच संपादक गंमत भंडारी यांचे तेरा वर्षापासूनचे घर बेकायदा असल्याने ते 16 नोव्हेंबर रोजी पाडण्यात येणार असल्याचे नोटिसीत नमुद करण्यात आलं आहे.माध्यमांचा आवाज वेगवेगळ्या पध्दतीनं बंद करण्याचे प्रकार महाराष्ट्रात सर्रास सुरू आहेत.कधी पत्रकारांवर हल्ले करून,कधी खोटे गुन्हे दाखल करून ,कधी नोकरीवर गंडांतर आणून तर कधी चक्क घरं आणि दैनिकाच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवून माध्यमांना जेरीस आणले जात आहे.पार्श्‍वभूमीने नेहमीच रोखठोक आणि समाजहिताची भूमिका घेतली,त्यातून अऩेकांचे हितसंबंध धोक्यात आले असल्यानेच हितसंबंधीयानी एकत्र येत पार्श्‍वभूमीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न चालविला असल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून पार्श्‍वभूमीवर होऊ घातलेली कारवाई थांबवावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here