संपादकांच्या मोदी भेटीने वाद

0
653

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळी मिलनच्या नावाखाली दिल्लीतील बीजेपी बीट पाहणारे रिपोर्टर तसेच हिंदी दैनिकांच्या संपादकांशी चर्चा केली होती.त्यावेळेस इंग्रजी दैनिकांचे बडे संपादक दिसले नाहीत.दिवाळी मिलनसाठी त्यांना बोलावले गेले नव्हते की,त्यांनीच गर्दीत यायचे नाकारले माहित नाही पण आता बातमी अशी आहे की,नरेंद्र मोदी यांनी बड्या इंग्रजी दैनिकांच्या संपादकांना विशेष निमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली आहे.3 नोव्हेंबर रोजी ही भेट झाली.ती गुप्त ठेवली गेली आहे.मात्र यावरून आता हिंदी आणि इंग्रजी पत्रकारांमध्ये वाद उद्भभला असून पतप्रधान हिंदी पेक्षा इंग्रजी दैनिकांना किवा वाहिन्यांच्या प्रतिनिधी,संपादकांना अधिक महत्व देतात असा सूर व्यक्त व्हायला लागला आहे.
3 नोव्हेंबर रोजी जे दहा बडे संपादक मोदींना भेटले त्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर इन चीफ जयदीप बोस,हिंदुस्थान टाइम्सचे एडिटर इन चीफ,संजॉय नारायण,संडे गार्डीयनचे एडिटोरियल डायरेक्टर एन मोनू नलपत,टेलिग्राफचे संपादक मानिनी चटर्जी,द हिंदूच्या एडिटर मालिनी पार्थसारथी,इंडियन एक्स्प्रेसचे चीफ एडिटर राजकमल झा,इंडिया टुडे ग्रुपचे एडिटोरियल ऍडव्हायजर शेखऱ गुप्ता डेक्कन क्रॉनिकलचे चेअरमन टी वी रेड्डी,द ट्रीव्यूनचे के राज चेनगप्पा,आणि इंडियन एक्स्प्रेसचे एडिटोरियल डायरेक्टर प्रभू चावला यांचा समावेश ङोता.
पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या संपादकांनी या भेटीवर चुप्पी साधली आहे.या भेटीवरून दिल्लीत आता पत्रकारांमध्येच भाषिक वाद सुरू झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here