संपत डोकेंचे डोके का भडकले?

0
1015
संपत डोकेंचे डोके का भडकले?
सुनील ढेपे यांनी लिहिलेल्या ज्या कॉलमवरून नगरसेवक संपत डोके यांचे डोके फिरले आणि त्यानी सुनील ढेपेंना शिविगाळ केली तो मजकूर असा.संवादाच्या रूपानं लिहिलेल्या या मजकुरात संपत डोके यांच्या भावना दुखावण्यासारखं काहीच दिसत नाही.
पक्या – आरं ये तुक्या….आज तू हाईस तर कुठं ?
तुक्या – आरं, म्या जरा आण्णाबरूबर शेताकडं गेलो व्हतो…काय इशेष ?
पक्या – काय नाय रं…आपल्या पालिकेसमोर आज लईच फटाके फुटले बघ…
तुक्या – आँ…काय सांगतोस…इतक्या लवकर,आबा नगराध्यक्ष झाले की काय ?
पक्या – ह्यॅ ह्यॅ ह्यॅ…काय झक्कास इनोद करतोस बघ तुक्या…
तुक्या – आरं,.त्यात इनोद कसला…आबानं फारम सुध्दा घेतला व्हता की सकाळी…
पक्या – आता तो फारम कोरच राहणार ….
तुक्या – आँ…ते कशावरून म्हणतोस ?
पक्या – आरं नंदु भैय्याच पुन्हा जिंकले की…
तुक्या – छ्या…ते कसं काय ? त्यांना आमच्या रणजित साहेबांनी तर अपात्र ठरवलं व्हतं की…मग जिंकले कसे ?
पक्या – आरं तुमच्या रणजित साहेंबाच्या निर्णयाला कोर्टानी स्टे दिला म्हण…
तुक्या – आरं रणजित साहेबांच्या नव्हं….कलेक्टर साहेबांच्या निर्णयाला स्टे दिला,असं उदय सांगत व्हता…
पक्या – म्हंजी नेमकं कसं काय ?
तुक्या – आरं कलेक्टर साहेबांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली व्हती ना…त्याला स्टे मिळाला…
पक्या – आरं एकूण एकच की…आता त्याला बी स्टे मिळल की…
तुक्या – आँ…काय सांगतोस…मग आबाच्या नगराध्यक्षपदाचं काय ?
पक्या – आता ते आबालाच जावून इच्चार…
तुक्या – आरं..आरं…आरं…आबाचं नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहणार म्हण की…
पक्या – होतील की भविष्यात…त्यात काय अवघड हाय…
तुक्या – आरं बाबा,नंदु भैय्या राजीनामाच द्यायला तयार नाहीत…मग होणार कसं ?
पक्या – बरं,राजीनाम्यावरून मला आठवलं…आबा अन् तीन नगरसेवक राजीनामा देणार व्हते,त्याचं काय झालं ?
तुक्या – आरं कशाचं काय ? कोणाच्यातबी डेरिंग होईना…उगी नुसती हवा व्हती…
पक्या – मग आता इलेक्शनपर्यंत नंदुभैय्याचं नगराध्यक्षच हायती म्हण की…
तुक्या – तसंच समज…नाय तर आबा नगराध्यक्ष झाल्यावर असा कोंचा फरक पडणार व्हता…
पक्या – ह्यॅ ह्यॅ ह्यॅ…उलट नंदुभैय्या हायती म्हणून सारी कामं पटापट होत्यात…असं चंद्या म्हणत व्हता…
तुक्या – आरं नंदुभैय्या,इथलं वतनदार …त्यामुळं कर्मचारी बी सरळ झालेत बघ…
पक्या – नगराध्यक्ष म्हटला की,दमदार माणूस लागतो गड्या…नाय तर बायको नगराध्यक्ष अन् नवरा कारभारी…
तुक्या – ह्यॅ ह्यॅ ह्यॅ…नंदुभैय्या सगळ्यांना घेवून चालत्यात म्हणून काही जणांच्या पोटात गोळा उठलाय बघ …
पक्या – तो उठणारच…बर एक सांग तुक्या…कलेक्टर साहेबांनी राज्यमंत्र्यांचा निकाल येताच निवडणूक लावण्याची इतकी घाई का बरं केली रं?
तुक्या – आरं कलेक्टर साहेंब नंदुभैय्यावर लईच चिडून हायती,असं कलेक्टर हापीसमधील एकजण सांगत व्हता…
पक्या – ऑ…ते कशापाई रं….
तुक्या – आरं पालिकेचे काही कर्मचारी महसूल अधिका-यांच्या घरात पाणी भरत व्हते…
पक्या – ते तर लई दिसापासून भरत्यात…त्यात काय इशेष…
तुक्या – आरं ते नंदुभैय्यांनं काढून घेतल्यानं कलेक्टर साहेबांना आयतं कोलीत मिळालं व्हतं…
पक्या – आसं व्हय…तरीच म्हटलं…कलेक्टर साहेबांनी पण नंदुभैय्याच्या इरोधात कसा काय निकाल दिला…
तुक्या – आरं यात लई जणांची डाळ शिजणार व्हती…पण घडलं इपरीतच..
पक्या – त्यो नंदुभैय्याचा नाना म्हणत व्हता…भगवान के घर के देर है,लेकिन अंधेर नही….
तुक्या – ह्यॅ ह्यॅ ह्यॅ…आता अंधार पडायची येळ झाली….चल आता…पुन्हा भेटू…
– सुनील ढेपे

Related Photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here