अलिबाग- रायगड प्रेस क्लब ही रायगडमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था.रायगडच्या सामाजिक क्षेत्रात विशेष स्थान असलेल्या या संस्थेनं रायगडमधील विविध प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचा नेटानं प्रयत्न केला आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकऱणाचा विषय सहा वर्षापूवी हाती घेत तो विषय पत्रकारांनी यशस्वीपणे मार्गी लावला.एक विषय हाती घेणे आणि तो सतत सहा वर्षे लावून धरल्याचे सीमा लढ्यानंतरचं दुसरं उदाहरण राज्यात नाही.त्यामुळं रायगड प्रेस क्लबची सारी टीम अभिनंदनास पात्र आहे.
रायगड प्रेस क्लबचं आणखी एक वैशिष्टय असं की,रायगड प्रेस क्लबच्या निवडणुका बिनविरोध होतात.सारे सदस्य एकत्र जमतात.एक दिलानं आपले पदाधिकारी निवडतात.आतापर्यत तरी या व्यवस्थेत बदल झालेला नाही.संस्था स्थापन करतानाच हे नियोजन केलं होतं.निवडणुका म्हटलं की,जय -परायज येता.त्यातून पराभूत गट जे जिंकलेत त्यांना काम करू देत नाही.असं दिसून येतं.हे सारं टाळण्याचा प्रय़त्न केला आहे.यातून पत्रकारांची भक्कम एकजूट आणि दबावगट तयार झालेला आहे.
दर दोन वर्षांनी पदाधिकारी बदलतात.आजचा कार्याध्यक्ष हा उद्याचा अध्यक्ष असतो.त्यानुसार रेवदंडा येथे नुकत्याच झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवे पदाधिकारी बिनविरोध निवडले गेले.विद्यमान कार्याध्यक्ष संतोष पेरणे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर विद्यमान सरचिटणीस भारत रांजनकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली.नव्या रचनेत जिल्हयातील सर्व तालुक्यांना समानसंधी देण्याचा प्रय़त्न केला आहे.काही पत्रकारांना नव्यानं प्रवाहात सामिल करून घेतलंंंंं गेलं आहे.त्यामुळं रायगड प्रेस क्लब अधिक भक्कम झाली आहे.रेवदंडा येथील बैठकीत सारं गुण्या गोविदांनं पार पडलं.याचं श्रेय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,अभय आपटे,विद्यमान अध्यक्ष विजय पवार आणि सर्व सदस्यांना द्यावं लागेल.हीच एकजूट भविष्यात कायम राहावी अशी अपेक्षा आहे.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचं मनःपूूर्वक अभिनंदन.नव्या नियुक्तया जाहीर झालेल्या असल्यातरी ते आपल्या पदाची सूत्रे येत्या 24 मार्च रोजी संस्थेच्या वर्धापनदिनी स्वीकारतील.हा कार्यक्रम खालापूरला होत आहे.