संजीव जोशी यांची कोकण विभागीय सचिवपदी नियुक्ती
जगदीश राठोड अमरावती विभागीय सचिव

पुणे दिनांक 3ः मराठी पत्रकार परिषदेच्या रिक्त असलेल्या कोकण विभागीय सचिवपदी पालघरचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजतंत्र दैनिकाचे संपादक संजीव जोशी यांची तर अमरावती विभागीय सचिवपदी वाशिम जिल्हयातील जगदीश रोठोड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीने एकमताने या दोन्ही नियुक्तया केल्या आहे.विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपेपर्यंत या नवीन सचिवांचा कार्यकाळ असेल.
कोकण विभागीय सचिवांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.संजीव जोशी यांच्याकडे पालघर,ठाणे,रायगड,आणि रत्नागिरी या जिल्हयांची जबाबदारी सोपविण्यात आली असून संघटनात्मक बांधणी आणि परिषदेचा विस्तार करण्यासाठी संजीव जोशी आणि राठोड प्रयत्न करतील.

LEAVE A REPLY