संजय राऊत यांना सी.डी.देशमुख पुरस्कार

0
836

डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या जन्मदिनी रोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा डॉ. चिंतामणराव देशमुख स्मृति पत्रकारीता पुरस्कार दैनिक सामनाचे संपादक खा. संजय राऊत यांना तर राजाभाऊ देसाई स्मृति  शोध पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे  काेकण विभागीय  समन्वयक तथा विशेष प्रतिनिधी जयंत धुळप यांना आणि जनार्दन शेडगे स्मृति उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार प्रहार मुंबई आवृत्तीचे अतुल मळेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे सदस्य विजय देसाई यांनी दिली आहे.
दरवर्षी 14 जानेवारी रोजी होणारा पुरस्कार वितरण कार्यक्रम यावर्षी शनिवार दि. 21 जानेवारी रोजी रोहयातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहात होणार आहे, अशी माहिती रोहा तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here