ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती देताना त्याचे निकष बदलावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं केली होती.वीस वर्षे अनुभव  आणि पन्नास वर्षे वय असणार्‍या पत्रकारांस ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती दिली जावी ही मागणी 2013 मध्ये आम्ही नागपूर अधिवेशनात केली होती.त्याच्या साक्षीदार असलेल्या माहिती आणि जनसंपर्कच्या तत्कालिन संचालक श्रीमती श्रध्दा बेलसरे यांनी आज फेसबुकवर टाकलेल्या प्रतिक्रियेत “एस.एम, आणि परिषदेने ही मागणी केली होती त्याची मी साक्षीदार आहे” असे म्हटले आहे.सत्य हे सत्यच असते हे मान्य करीत श्रेयाचे ढोल पिटण्याचे उद्योग आता तरी थांबवावेत ही विनंती.–

LEAVE A REPLY