शेतकऱ्यांचा सन्मान बांधावर…एक अनोखा प्रयत्न

0
1061

रायगडः महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटना चांगले सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात.रायगड प्रेस क्लबने तर नेहमीच जनतेचे प्रश्न वेशिवर टांगण्याचे काम केले आहे.एवढेच नव्हे तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या घटकांचा सन्मानही केलेला आहे.शेतकरी हा सर्वार्थाने उपेक्षित घटत पण या शेतकऱ्यांनीच आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढविले आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले.रायगडातही अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळंच त्यांच्या कार्याचा गौरव कऱण्याचा निर्णय़ रायगड प्रेस क्लबनं घेतला.या सत्कार समारंभाचं वैशिष्टय असं की,शेतकरी जिथं घाम गाळतात त्याच शेतावर जाऊन त्यांचा सत्कार करायचा निर्णय रायगड प्रेस क्लबनं घेतला.जिल्हयाच्या पंधरा तालुक्यात हा उपक्रम येत्या रविवारी 13 जून रोजी होत आहे.अशा पध्दतीचा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्यानं रायगड प्रेस क्लबच्या सर्व तरूण पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे.विशेषतः पत्रकारांची ही चळवळ जिवंत ठेवणारे संतोष पवार,विजय पवार,मिलिंद अष्टीवकर,संतोष पेऱणे,अभय आपटे.नागेश कुळकर्णी,संजय मोहिते आणि त्याचे असंख्य सहकारी या सर्वांना बातमीदाचा मनःपूवर्क शूभेच्छा
.ज्यांना शक्य असेल त्यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जरूर याव.हे आग्रहाचं निमंत्रण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here