शेगाव ( टीम बातमीदार ) अकोला जिल्हयातील शेगाव येथील मातृभूमीचे वातार्हर देवानंद उमाले ायंच्यावर काल शेगाव येथे जीवघेणा हल्ला झाला.काही दिवसांपूवीर् उमाले यांनी स्थानिक काही पुढाऱ्यांच्या विरोधात बातमी छापली होती.त्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप उमाले यांनी केला आहे.सात-आठ हल्लेखोऱ आले आणि त्यांनी अचानक हल्ला केला.हा हल्ला झाला तेव्हा स्थानिक पत्रकार कृष्णा म्हस्के,दिनशे महाजन,मंगेश ढोले आदि पत्रकार होते.हल्ल्यात उमाले यांच्या डोक्याला .मानेला मार लागला असून त्यांच्यावर रूगण्लायत उपचार करण्यात आले आहेत.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.सरकार पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी काहीच उपाययोजना करीत नसल्यानेच हे हल्ले होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.०१४मघ्ये महाराष्ट्रातील पत्रकारावर झालेला हा ३६ वा हल्ला आहे.या वषार्त दोन पत्रकाराचं खूनही झाले आहेत.