अलिबाग- शेतकरी कामगार पक्ष आता शेतकरी आणि कामगारांचा पक्ष राहिला नसून तो धनिकांचा पक्ष बनला असल्याने हा पक्ष आता संदर्भहिन झाला असल्याची टीका शिवसेेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.
रायगड जिल्हयात आज दिवसभरात उध्दव ठाकरे यांच्या माणगाव,अलिबाग आणि कर्जत येथे जाहीर सभा झाल्या.या तीनही सभांमधून उद्दव ठाकरे यांनी भाजप,राष्ट्रवादी तसेच शेकापला आपला निशाणा बनविले.
अ़िलबागच्या सभेत शेकापवर प्रहार करताना त्यांनी शेकापला राष्ट्रवादीबरोबर युती करायची असल्यानेच त्यांनी लोकसभेच्या वेळेस शिवसेने बरोबरची युती तोडल्याचा आरोप त्यांनी केला.लोकसभेच्या वेळेस तुम्ही नरकासुराचा वध केलात आता महिषासुराचा वध करा असे आवाहन ठाकरे यांनी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला केेले.
माणगाावच्या सभेत त्यांनी महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ आहोत दिल्लीची लाचारी आम्हाला मान्य नसल्याच्या वक्त व्याचा पुनरूच्चार केला. केंद्रीय मंत्री अनंत गीते यावेळी उपस्थित होते. तीनही सभांना मोठी गर्दी झाली होती.