स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच भारतीय शेतकरी कामगार पक्षाची नोंदणी रद्द झाल्याने रायगड जिल्हयातील कार्यकत्यार्ंमध्ये मोठीच खळबळ निर्माण झाली आहे.68 वर्षाची परंपरा असलेल्या शेकापचा रायगड जिल्हयात चांगलाच प्रभाव असून जिल्हयात पक्षाचे तीन आमदारही आहेत.रायगड जिल्हा परिषद,काही नगरपालिकेत संत्तेत असलेल्या शेकापकडे जिल्हा मध्यवर्ती बॅकेची सूत्रेही आहेत.शेकापने आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची जोरात तयारी सुरू केलेली असतानाच निवडणूक आयोगाने नोंदणीच रद्द केल्याने तो या पक्षाला मोठा झटका समजला जात आहे.नोंदणी रद्द झाल्याने स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढविता येणार नाहीत.त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रत्येक उमेदवाराला वेगळे चिन्हा घ्यावे लागणार आहे.ते पक्षासाठी त्रासदायक ठरणार आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी आयोगाच्या या निर्णयाला पक्षाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते अशी शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.–