पत्रकारांचा बहिष्कार

0
800

फोटोग्राफरशी अरेरावी करणाऱ्या सलमानच्या बायकॉटचा फटका बसल्यानंतर आता शाहरूख खानवर तशीच वेळ आली आहे.किंगखानच्या हॅपी न्यू इअर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित प्रेस कॉन्फरन्सला शाहरूखखान तब्बल चार तास उशिरा आले.त्यांची वाट पाहून पत्रकार कंटाळून गेले होते त्यामुळे पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकला होता.पत्रकार चिडलेले बघून शाहरूखने प्रत्येक पत्रकाराला एक्सक्ल्युजिव मुलाखत देण्याचे मान्य केले पण त्याने पत्रकारांचे समाधान झाले नाही.पत्रकार प्रेस कॉन्फरन्स सोडून निघून गेले.काल म्हणजे शुक्रवारी हा प्रकार घडला.काही दिवसांपूर्वीच शाहरूखने म्हटले होते की,ज्या चित्रपटात आपण असतो तो चित्रपट आपोआपच मोठा होतो.
हॅपी न्यू एअर हा चित्रपट दिवाळीत 24 ऑक्टोबरला रिलिज होत आहे.या चित्रपटात शाहरूख खान,दीपिका पदुकोण,अभिषेक बच्चन,बोमन इरानी,सोनू सूद यांच्या भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here