शार्ली हेब्दोचा खप वाढला

0
828
शार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकावर मागील महिन्यात झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर या साप्ताहिकाचा खप १० हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला आहे.

या साप्ताहिकाच्या कार्यालयावर सात जानेवारीला काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात संपादकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याचा खप १० हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला असल्याचे सहव्यवस्थापक एरिक पोर्टहॉल्ट यांनी म्हटले आहे. मात्र, या वाढीव उत्पन्नातील काही भाग या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हल्ल्यापूर्वी हे साप्ताहिक आर्थिक हलाखीचा सामना करीत होते, मात्र आता ते सुस्थितीत असल्याचेही पोर्टहॉल्ट यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here