शरद यादव म्हणाले,केवळ डीडीच बघा

0
893

 जदयू चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी माध्यमांबद्दलची मळमळ पुन्हा एकदा ओकली आहे.ते म्हणाले,सध्या केवळ लोकसभा टीव्ही आणि डीडीवन याच वाहिन्या पहा कारण अन्य वाहिन्यांवर केवळ थापा आणि खोट्याच बातम्या दाखविल्या जात आहेत.

ते म्हणाले,पूर्वी मी जेव्हा बोलायचो तेव्हा ती बातमी पहिल्या पानावर यायची.आता आतल्या पानावर जाते.( यादवांचं दुःख हेच आहे.,समाजातलं स्थान कमी झालं की,बातम्या आतल्या पानावरच जातात आणि मग हे नेते माध्यमांच्या नावानं बोंबा मारतात) ते पुढे म्हणाले,मी अलिकडं प्रेस कॉन्फरन्स घेतच नाही कारण मी जे बोलेल ते छापलं जाणार नाही.
जाता जाता त्यांनी पत्रकारांसाठी एक चॉकलेट दिले आपण सत्तेवर आलो तर माध्यमांबाबतचे वेतन धोरण नक्की करू.माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळाले पाहिजेत असे मत त्यांनी माांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here