लोकसभा निवडणुकात पराभूूत झालेले विविध पक्षीय नेते आता आपला राग माध्यमं आणि पत्रकारांवर काढायला लागले आहे.जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी आज हेच केले.दिल्लीत त्यांनी पत्रकारांना आपल्या घरी बोलावले.पत्रकारांनी बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी लालू प्रसाद यांची मदत घेणार काय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते पत्रकारांवर भडकले.त्यांनी पत्रकारांना बंधक अशी उपमा तर दिलीच शिवाय पत्रकारांची समज कमी असल्याची टिप्पणी देखील त्यांनी केली होती.बिहारमधील सरकार टिकविण्यासाठी जदयू आपला कट्टर प्रतिस्पधीर् असलेले लालू प्रसाद यांची मदत घेणार अशी चचार् गेली दोन दिवस सुरू होती.