Saturday, May 15, 2021

वृत्तपत्र विके्रत्यांच्या लढ्याला यश…

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर पंधरा दिवसात निर्णय घेणार
सांगली: प्रतिनिधी
——————
 
मुंबई, ठाणेसह एमएमआर क्षेत्रातील आणि राज्‍यातील सर्व महापालिका हद्दील वृत्तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍यात यावे असे निर्देश ता‍तडीने सर्व महापालिकांना देण्‍यात येतील. तर रेल्‍वे हद्दीतील विकेत्‍यांना संरक्षण देण्‍याबाबत रेल्‍वेच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांना कळ‍वण्‍यात येईल. तसेच या विक्रेत्‍यांचे प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्‍यासाठी लोकप्रतिनीधी, विक्रेत्‍या संघटना आणि संबंधित पालिका आयुक्‍त व रेल्‍वे व शासनाच्‍या अधिका-यांची संयुक्‍त बैठक येत्‍या पंधरा दिवसात घेण्‍यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्‍य मंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने या घोषणेचे स्वागत केले असून आता वेळ न घालवता 15 दिवसात शासनाने ही घोषणा पूर्ण करावी असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार व उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी केले आहे.
मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्‍या माध्‍यमातून वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचे प्रश्‍न मांडले. यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, हे विक्रेते अत्‍यंत अल्‍प मानधनावर काम करीत आहेत. वृत्‍तपत्र आणि बातम्‍या वाचकापर्यंत पोहचवणारा हा घटक महत्‍वाचा आहेच. शिवाय शासनाच्‍या नोटीस, गॅजेटही जनतेपर्यंत पोहचवणारा हा महत्‍वाचा घटक आहे. या व्‍यवसायावर सुमारे दिड लाख कुटुंबांचा उदर्निवाह अवलंबून आहे. पण दुदैवाने त्‍यांच्‍यावर महापालिका आणि रेल्‍वेकडून वारंवार कारवाई करून त्‍यांचे नुकसान केले जाते. हा व्‍यवसाय काही पैशांच्‍या मानधनावर केला जात असताना त्‍यांना कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. त्‍यामुळे फेरिवाल्‍यांवर कारवाई करताना अशा विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍यात यावे व त्‍याबाबतचे आदेश महापालिकांना व रेल्‍वेला देण्‍यात यावेत. तसेच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍याकडे संघटनांच्‍या 19 जुलै 2017 ला झालेल्‍या बैठकीत अशा वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांसाठी कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आली होता. त्‍या मंडळाची स्‍थापना तातडीने करण्‍यात यावी, अशा मागण्‍या त्‍यांनी केल्‍या. तर भाजपा आमदार संजय केळकर यांनीही ठाणे आणि परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्‍यांच्‍या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. तसेच आमदार मंगल प्रभात लोढा यांनीही या चर्चेत भाग घेत या मागण्‍यांना बळ देत भाजपा आमदारांनी अत्‍यंत आक्रमकपणे यांच्‍या मागण्‍या मांडल्‍या.
या चर्चेला उत्‍तर देताना राज्‍य मंत्री रणजित पाटील यांनी सांगितले की, 24 आक्‍टोबर 2017 ला आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या सह वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्‍यावेळी त्‍यांच्‍या पत्रावर मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत मुंबई महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार ठाण्‍यासह राज्‍यातील सर्व महापालिकांना वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍याबाबत निर्देश देण्‍यात येतील. तसेच फेरिवाला धोरण निश्चित करण्‍यात येत असून त्‍यामध्‍ये न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार फेरिवाल्‍या कमिटी गठीत करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत असून ती येत्‍या दोन महिन्‍यात पुर्ण करण्‍यात येईल. या धोरणामध्‍ये वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचा झोन करून संरक्षण देण्‍याबाबत शासन सरकारत्‍मक आहे. फेरिवाल्‍यांच्‍या धोरणात वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांसाठी स्वतंत्र कलम टाकून त्‍यांना संरक्षीत करण्‍यात येईल. तसेच त्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत चर्चा करून तोडगा काढता यावा म्‍हणून येत्‍या पंधरा दिवसात रेल्‍वेसह संयुक्‍त बैठक शासनाकडून घेण्‍यात येईल, असेही राज्‍यमंत्र्यांनी जाहीर केले.
चौकट करणे
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने कल्याणकारी मंडळासाठी 5 डिसेंबरला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार श्री शेलार यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधले. याची दखल शासनाने घेतली. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विकास सूर्यवंशी, मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटक सचिन चोपडे, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, विशाल रासनकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व शहरासह जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी या घोषणेबद्दल समाधान व्यक्त केले असून तात्काळ घोषणेची पूर्तता करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबद्दल आमदार श्री शेलार यांचे आभार मानण्याय आले.

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!