नांदेड अधिवेशन 2019 

मुंबईः पत्रकार पेन्शन,पत्रकार संरक्षण कायदा,मजिठियाची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न या व अन्य प्रश्‍नांसाठी मराठी पत्रकार परिषद सातत्यानं लढा देत आहे.पेन्शनची लढाई परिषद 23 वर्षांपासून लढत आहे तर कायद्यासाठी परिषदेने सतत बारा वर्षे संघर्ष केलेला आहे.छोटया वृत्तपत्रांच्या अडचणी तर परिषदेसाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे आणि त्यासाठी परिषद सतत संघर्ष करीत आली आहे.त्यामुळं यातील काही प्रश्‍न मार्गी लागले किंवा लागण्याच्या मार्गावर आहेत.अर्थात हा लढा म्हणजे  पत्रकारांच्या एकजुटीचा वेगळा अनुभव होता.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील अनेक पत्रकार संघटना एकत्र आल्या आणि त्यातून पत्रकारांची मोठीच चळवळ राज्यात उभी राहिली.या चळवळीची धास्ती राज्यकर्त्यामध्ये निर्माण झाली.त्यामुळं पत्रकारांना जे काही मिळालं ते संघटन शक्तीचा आविष्कार आहे असं आम्हाला वाटतं.वेगवेगळ्या संघटनांशी जोडले गेलेले राज्यातील हजारो पत्रकार पत्रकारांच्या हक्कासाठीच्या लढयात उतरले आणि भक्कम एकजूट दाखवून दिली. म्हणूनच या लढ्यात ज्या ज्या संघटनांनी आपलं योगदान दिलं त्या संघटनांच्या अध्यक्ष आणि अन्य पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्याचा निर्णय पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.परिषदेच्या नांदेड अधिवेशनातील एका विशेष सत्रात रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी  दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे.सर्व संघटनांच्या अध्यक्षांनी हा राज्यातील पत्रकारांच्यावतीने केला जाणारा हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

ज्या काही पत्रकार संघटनांना आम्ही सन्मानित करीत आहोत त्यामध्ये खालील संघटनांचा समावेश आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ ः                 अध्यक्ष नरेंद्र वाबळे

मुंबई प्रेस क्लब           ः                       अध्यक्ष धर्मेद्र जोरे

टीव्हीजेए              ः                           अध्यक्ष विनोद जगदाळे

मंत्राल,विधिमंडळ वार्ताहर संघ ः         अध्यक्ष दिलीप सपाटे

महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ  ः           अध्यक्ष प्रदीप मैत्र

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती ः    किरण नाईक,प्रफुल्ल मारपकवार 

महाराष्ट्र संपादक परिषद          ः       अध्यक्ष संजय मलमे 

बीयुजे                         ः                      सरचिटणीस इंदरकुमार जैन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here