मुंबई मराठी पत्रकार संघाकडून कंगना राणावतचा निषेध

मुंबई : पत्रकारांविषयी आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या, विशेषत: पीटीआयचे प्रतिनिधी जस्टिन राव यांना अपमानित करून वृत्त माध्यमांना लाखोल्या वाहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा मुंबई मराठी पत्रकार संघाने आज निषेध केला.

 दि. 7 जुलै 2019 रोजी एका हिंदी चित्रपटाच्या गीत प्रदर्शन प्रसंगी जस्टिन राव यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच कंगना राणावत हिने त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यास सुरुवात केली. राव हे शांत होते. पण तरीही सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी मायक्रोफोन काढून घेत त्यांना व इतर पत्रकारांना बाऊंसर्सद्वारे धक्काबुक्की केली. या घटनेनंतर राणावत हीची बहीण रंगोली चांडेल हीनेदेखील ट्वीटरद्वारे पत्रकारांवर आगपाखड केली. `नालायक', `नंगे', `सस्ते' आणि `बिकाऊ' अशा शब्दात रंगोली हीने आपल्या `सभ्यते'चे आणि `संस्कृति'चे प्रदर्शन केले. या दोघींची ही वर्तणुक आक्षेपार्ह, संतापजनक आणि निंदनीय असून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी केली आहे. यासंदर्भात `द एंटरटेंनमेंट जर्नलिस्ट गिल्ड'ने उपस्थित केलेल्या मुद्यांना पत्रकार संघाचा पाठिंबा असून `गिल्ड'ने केलेल्या मागणीनुसार राणावतने जस्टिन राव यांची व इतर पत्रकारांची त्वरित माफी मागावी, असेही श्री. वाबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना राणावत ने आपल्या बेताल वक्तव्या बद्दल पत्रकारांची माफी मागावी:- टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन

अभिनेत्री कंगना राणावतने एंटरटेनमेंट जर्नलिस्ट जस्टिन रावचा अपमान केला. तसेच, पत्रकारांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. त्याचा निषेध टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन करत आहे. आज पत्रकार आणि मीडिया जगत हे लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र, कंगनाच्या कडून पातळी सोडून झालेल्या वक्तव्यांची निंदा करावी तेवढे कमी आहे. एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ने जो लढ़ा सुरु केला आहे त्याला टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन समर्थन करत असून आमची मागणी आहे की, कंगना राणावत यांनी आपल्या बेताल वक्तव्याबद्दल पत्रकारांची माफी मागावी.

प्रशांत पांडेय विनोद जगदाळे
महासचिव अध्यक्ष

BUJ

condemns actor Kangana Ranaut’s attack on entertainment journalists
BUJ expresses solidarity with PTI journalist Justin Rao

Brihanmumbai Union of Journalists (BUJ) condemns the unwarranted attack on entertainment journalists by Hindi film actor Kangana Ranaut and expresses solidarity with PTI journalist Justin Rao, who became an unlikely victim of the actor’s unprovoked and unjustified ire.

The BUJ is shocked at Kangna Ranaut’s irresponsible and unjustified rant against journalists. The attack on journalists who dare hold independent opinions as anti-national and ‘traitors’ to the nation is not only dangerous but of a piece with an increasingly authoritarian narrative that is unfortunately endemic in all sections of society today. This trend, which is inherently intimidatory and seeks to warn dissenters to toe the line or else…, must be stiffly combated by all those committed to democratic values.

Last week, in a press conference related to her forthcoming movie ‘Judgemental Hai Kya’, the actor took umbrage at a question posed by Rao. She did not even allow him to complete the question and accused him of running a smear campaign against her as well as trashing her earlier movie Manikarnika. Rao, while denying her allegations, stood his ground.

The Entertainment Journalists Guild demanded an apology from the actor and producer Ekta Kapoor, threatening a boycott of the movie. While Kapoor apologised, Kangna Ranaut went further in her attack on the media. She released a video in which she called journalists as ‘anti-national’, freeloaders, termites and dared a section of media to ban her. She arrogantly claimed that journalists earn their bread and butter because of her.

Absurdly, her manager and sister Rangoli issued a legal notice alleging violation of the Press Council’s code of conduct for journalists (without referring to the organization) and said that journalists who support or encourage the Entertainment Journalists Guild would be guilty of ‘conspiracy, connivance and abetment’.

Perhaps Ms Ranaut and her legal advisors are unaware of the fact that this code, excellent as it is, is self-regulatory and does not have a legal mandate. Besides, there are other mechanisms for citizens to seek redressal of their grievances vis-à-vis the media. In addition, may we point out that the right of association is a fundamental right in the Constitution of India.

The BUJ echoes the demand of the Entertainment Journalists Guild that the actor apologise for her remarks and calls upon the actor to desist from her attacks on the media and her attempts to malign journalists and question their integrity.
-Indrakumar Jain
General Secretary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here