विनोद जगदाळे यांना युवा संपादक पुरस्कार

0
1113

*रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर ; विनोद जगदाळे यांना* *आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार जाहीर*

२२ मार्च रोजी अलिबाग मध्ये प्रेस क्लब सन्मान  सोहोळा

अलिबाग ५ मार्च
     रायगड प्रेस क्लबचे राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा आचार्य अत्रे युवा पत्रकार पुरस्कार न्यूज २४ चे सहसंपादक तथा टीव्हीजेए चे अध्यक्ष विनोद  जगदाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिनी २२ मार्च रोजी अलिबाग येथे आयोजित प्रेस क्लब सन्मान सोहोळयात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
     कोलाड येथील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहात रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकारयांच्या  बैठकीत हे पुरस्कार सर्वानुमते जाहीर करण्यात आले.यामध्ये रायगड प्रेस क्लब जीवन गौरव पुरस्कार वामन पाटील(अलिबाग),कै. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार भालचंद्र कुलकर्णी (आपटा- रायगड),स्वर्गीय प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कारासाठी संतोष पाटील (पेण)
व सचिन कदम (महाड).तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जितू शिगवण(अलीबाग),युवा पत्रकार पुरस्कासासाठी सावन तवसाळकर(श्रीवर्धन),कल्पेश पवार (रोहा).तर सावित्रीबाई महिला पत्रकार पुरस्कार श्वेता जाधव (अलिबाग)यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी सुशील गोपीचंद साईकर (थळ,अलिबाग) व वृंदा अजित थत्ते (अलिबाग)यांची तर क्रीडा पुरस्कारासाठी हर्षाला मनोहर नाखवा(अलिबाग)यांची निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्हा श्रमीक पत्रकार पुरस्कार शशिकांत कुंभार (पनवेल)मुकुंद बेंबडे (खोपोली) तर विश्वास गायकवाड (माणगाव)याना जाहीर करण्यात आले आहेत.
     रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक अभय आपटे,मिलिंद अष्टीवकर,विजय मोकल यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष अनिल भोळे, कार्याध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, मनोज खांबे, सरचिटणीस शशिकांत मोरे,मानसी चेऊलकर,प्रशांत गोपाळे आदिंच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्षांनी  पुरस्कार्थींची नावे निश्चित केली.
    रायगड प्रेस क्लबच्या वर्धापनदिनी २२ मार्च. ला अलिबाग कार्लेखींड येथील आम्रवन येथे सकाळी १०:३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष
संस्थापक आदरणीय एस एम देशमुख,प़मुख पाहुणे ए.बी.पी. न्यूजचे पश्चिम भारत संपादक जितेंद्र दीक्षित,प्रमुख अतिथी आमदार महेंद्र दळवी, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,दीपक भाई रानवडे शिवसेना कामगार नेते नागेश कुलकर्णी,माजी अध्यक्ष अभय आपटे,मिलिंद अष्टीवकर ,संतोष पवार,विजय पवार,संतोष पेरणे,विजय मोकल सुकाणु समिती पदाधिकारी दीपक शिंदे, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.रायगड प्रेस क्लब सन्मान सोहाळयाच्या नियोजनासाठी अध्यक्ष अनिल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here