राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आज महायुतीत सहभागी होवून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण न मिळवून दिल्याने आपण नाराज झालो असल्याचे सांगत त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मेटेंना महायुतीत आणण्या मागे भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांचाच हात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा विनायन मेटेंना महायुतीत घेऊ नये असा कल होता. यामुळे काल मातोश्रीवर एक बैठक बोलवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमारास विनायक मेटे यांना महायुतीत सहभागी करून घेण्यात आले.