कोणतेही वाहन चालविताना जेव्हा आपण त्याचा परवाना घेतो. त्यावेळी चालक होणे हे एक व्रत आहे, असे समजून त्याचा स्विकार करावा व हे व्रत सदोदित अंगीकारावे. यामुळे स्वत:ची व समाजाची सुरक्षा राखली जाईल असे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी आज पनवेल कळंबोली येथे केले.
कळंबोली येथील परिवहन विभागाच्यावतीने आयोजित 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या सांगता समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, तसेच परिवहन अधिकारी दिपक उगले आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित हो
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पनवेल, कंळबोली, खारघर परिसरातील नागरीकांच्या जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या सांगता समारोह निमित्ताने भव्य अशा मोटार बाईक रॅलीचे आयोजन करुन हेल्मेट व रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली. या रॅलीस कळंबोली वाहतूक विभागाचे उपायुक्त नितीन पवार,यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. कळंबोली आरटीओ कार्यालया पासून सुरुवात झालेली रॅली खांदा कॉलनी, पनवेल एस.टी. स्टँड, शिवाजी चौक, कामोठे, खारघर, शिल्प चौक, उत्सव चौक मार्गे कळंबोली आरटीओ कार्यालय असा होता.