18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना

मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या विरोधात बातम्या देतो, त्यातून वाळू माफियांचे हितसंबंध दुखावतात, मग ते एकत्र येतात आणि 18 ते 20 जणांची ही टोळी आज सकाळी पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला करते.. त्यात पत्रकाराच्या डोक्याला जबर मार बसतो.. तो मरता मरता वाचतो.. .. एखादया चित्रपटात शोभून दिसेल अशी ही घटना घडली आहे जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद येथे.. या घटनेचे जे व्हीडीओ समोर आले आहेत ते आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प़श्न उपस्थित करणारे आहेत..
ज्ञानेश्वर पाबळे असं पत्रकाराचं नाव आहे.. ते पुढारीचं काम करतात.. पुढारीमधून त्यांनी सातत्यानं वाळू माफियांच्या विरोधात बातम्या दिल्या आहेत.. त्याचा राग मनात धरून अवैध वाळू उपसा करणारया वाळू माफियांनी हातात लाठ्या, काठ्या घेऊन पत्रकारावर हल्ला चढविला.. या हल्ल्यात ज्ञानेश्वर पाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
या प़करणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..जाफराबाद येथील सर्व पत्रकारांनी एकत्र येत तहसिलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे..
मराठवाडयात गावागावात वाळू माफियांनी धुडगूस घातला असून नद्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे.. तालुका प़शासन आणि जिल्हा प़शासन वाळू माफियांना पाठिशी घालत असल्याने वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.. पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठविला तर त्यांच्यावर सामुहिक हल्ले केले जात आहेत..
जाफराबाद येथील घटनेची चौकशी करून गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प़मुख एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.. एस.एम.देशमुख यांनी जाफराबाद येथील वाळू माफियांच्या गुंडगिरीचा निषेध केला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here