वाळित प्रकरणी 30 अटकेत

0
842

रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील खाजणी येथील मोहिनी तळेकर आत्महत्या प्रकरणी आज आणखी दहा आरोपींना अटक केरण्यात आल्याने या प्रकरणातील अटक केल्या गेलेल्या आरोपींची संख्या आता 30 झाली आहे.आणखी पाच आरोपी फरार आहेत.
अकरा महिन्यापूर्वी क्षुल्लक कारणांवरून गावकीनं मोहिनी तळेकर यांना वाळित टाकले होते.त्यांची धिंड देखील काढण्यात आली होती.त्या धक्क्याने वर्षभर अस्वस्थ झालेल्या तळेकर यांनी मागच्या महिन्यात 18 नोव्ेहबरला आत्महत्या केली होती.या प्रकरणी 35 जणाच्या विरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आले होते.मात्र हे आरोपी गेली आठ दिवस फरार होते.आता या प्रकरणातील 30 आरोपींना अटक कऱण्यात आली आहे.गावकीच्या त्रासाला कंटाऴूनच मोहिनी तळेकर यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
दरम्यान जिल्हयातील वाळित प्रकरणाच्या वाढत्या घटनामुळे आता जिल्हा प्रशासनाने सामाजिक बहिष्कार आणि कुटुंब वाळित प्रथा निर्मुलन अभियान हाती घेतले असून या अभियानाअंतर्गत जिल्हयात जनजागृती आणि प्रबोधनाचे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सुमत भागे यानी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here