वर्तमानपत्रांनी दिलंय,भरभरून कव्हरेज…

1
925

सकाळची मांडणी सर्वोत्कृष्ट

भारताच्या शूर जवानांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून काल ज्या पध्दतीनं पाकिस्तानला अद्यल घडविली त्याबद्दल काल सोशल मिडियावर तर कोट्यवधी भारतीयांनी जवानांचे अभिनंदन केलेच त्याचबरोबर आज वर्तमानपत्रांनी स्वाभाविकपणे पाकवरील हल्ल्याला भरभरून कव्हरेज दिले आहे.आजच्या मराठी वृत्तपत्रांमध्ये सर्वात चांगली मांडणी सकाळची आहे.आसुर मर्दन असा भेदक तेवढाच सुटसुटीत मथळा सकाळने दिला आहे.शस्त्र क्रिया या मथळ्याखाली सकाळने अग्रलेखाच्या माध्यमांतून भारतीय लष्कराचे कौतूकही केले आहे.लोकमतनंही सीमोल्लंघन असं समर्पक हेडिंग देत लढ्याला तोंड लागल्याचे भाकित अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.महाराष्ट्र टाइम्सने पाकव्याप्त काश्मीरात भारताचे हल्ले या मथळ्याखाली सविस्तर बातमी दिली आहे.दररोज मटाचे दोन अग्रलेख असतात मात्र आज रक्त आणि पाणी या मथळ्याखाली एकच सविस्तर अग्रलेख दिला गेला आहे.लोकसत्तानंही मोजक्या शब्दात बातमीचा मथळा दिला आहे.हिशेब चुकता असं बातमीचं शिर्षक आहे.छातीचे माप हे लोकसत्ताचे अग्रलेखाची शिर्षक आहे.पाकिस्तानाच घुसून उरीचा बदला असे सामनाने हेडिंग दिले आहे.प्रहारने बदलाः40 ठार असे शिर्षक दिले आहे.मात्र बातमीचे हेडिंग आणि अग्रलेखाचे हेडिंगही बदला असेच आहे..पुढारीचे हेडिंग रेल्वेच्या पटरीसारखे लांबलचक आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल ऑपरेशन ,सात तळ उद्दवस्थ,40 दहशतवाद्यांचा खातमा .अशी लांब लचक शिर्षकं देण्याची पध्दत पुर्वी होती.आज मोजक्या शब्दात शिर्षक देण्याची पध्दत आहे..भारतीयांच्या मनात जे होते ते सैन्याने करून दाखविले,पाकला घरात घुसून ठेचले असे दोन ओळीचे हेडिंग दिव्य मराठीने दिले आहे.धाडसी वाटेवरील पहिले पाऊल असा दीव्यचा अग्रलेख आहे.इंडियन एक्स्प्रेसने India Strike असं मोजक्या शब्दात शिर्षक दिलं आहे. हिंदुस्थान टाइम्सनं India Hits Terror Hubs Across Loc असा मथळा देत बातमी सजविली आहे. टाइम्स ऑफ इंडियाचे शिर्षकही सूचक आणि प्रभावी आहे.टाइम्सने PakCrossedThe Line,India Crossed Loc असा मथळा देत बातमी सजविली टाइम्सनं Avenging Uri असा मथळा देत अग्रलेख लिहिला आहे.थोडक्यात सर्वच अंकांनी हल्ल्याला ठळक आणि सविस्तर प्रसिध्दी दिली आहे.(SM) https://goo.gl/GtLujQ

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here