वडवणी मेळाव्याची जोरात तयारी सुरू

वडवणी : बीड जिल्ह्यातील वडवणी येथे रविवार दिनांक ९ जून रोजी आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचे पुरस्कार वितरण आणि राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा दुसरा मेळावा संपन्न होत आहे.. या मेळाव्याची जोरदार तयारी वडवणी तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात येत आहे..मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम देशमुख यांनी आज मेळावयाचया तयारीचा आढावा घेऊन बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि वडवणी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारयांशी चर्चा केली..
तालुका संघांचा पुरस्कार वितरण सोहळा ग्रामीण भागातच घेतला जातो… गेल्या वर्षी पाटण येथे हा सोहळा पार पडला होता.. यावर्षी वडवणीची निवड करण्यात आली आहे.. वडवणी – धारूर मागाॅवर रेणुका माता मंदिरात हा भव्य सोहळा होत आहे.. राज्य भारतील ३५४ तालुक्याचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत..
हा सोहळा दोन सत्रात होणार आहे.. पहिल्या सत्रात सकाळी १० ते १२. ३० या वेळात तालुका अध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा आणि दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ४ या काळात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.. दुपारी १ ते २ भोजनासाठी विश्रांती घेतली जाईल.. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून देवडी येथे एस. एम.देशमुख आणि दिलीप देशमुख यांच्या प्रयत्नातून बंधारा बांधला गेला आहे..या बंधारयामुळे देवडी गाव कायम दुष्काळ मुक्त होत आहे.. एक पत्रकार आणि एका माध्यम समुहाने सामाजिक बांधिलकी जपत ए्तिहासिक काम केले आहे.. . या बंधारयास भेटीचा काय॓क़म सायंकाळी ४.३० ते ५.३० या काळात आयोजित केला गेला आहे. दिवसभर भरगच्च कार्यक्रम होत आहेत..
आजच्या बैठकीस एस.एम.देशमुख, परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, काया॓धयक्ष डोळसे, परिषद प़तिनिधी विशाल सोळुंके सोशल मिडिया सेलचे अनिल वाघमारे, वडवणी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक जानकीराम उजगरे, अध्यक्ष बाबुराव जेथे, जगदीश गोरे, मुलमुले, धारूर पत्रकार संघाचे शाकिर, माजलगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष नाकलगावकर तसेच त्यांचे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते..
*वडवणीत कसं याल…
वडवणीला येण्यासाठी सध्यातरी फक्त रस्ता माग॓ उपलब्ध आहे.. रेल्वेने येणारयासाठी परळी वैजनाथ किवा मानवत रोड ही जवळची रेल्वे स्थानके आहेत..
वडवणी हा नव्यानेच झालेला तालुका आहे.. कायम दुष्काळी भाग ही या भागाची ओळख आहे.. बीड – परळी मागाॅवर बीड पासून पुवेॅला ३० किलो मिटर वर वडवणी आहे.. विदर्भातून येणारया पत्रकारांना सेलू, किंवा मानवत, पाथरी, तेलगाव मागेॅ वडवणीला येता येईल.. कोकणातून किंवा कोल्हापूर सांगलीहून येणारया पत्रकारांना उस्मानाबाद, कळंब, केज, धारूर मागेॅ वडवणीला येता येईल.. वडवणी पासून जवळच परळी वैजनाथ आहे, अंबाजोगाईची जोगेश्वरी आहे, देशातील हरिश्चंद्राचे एकमेव मंदीर हरिश्चंद्र पिंपरीत आहे.. मगरध्वज मंदिर चिंचवन येथे आहे.. शिवाय जायकवाडी प्रकल्प, ऊर्ध्व कुंडलिक प्रकल्प देखील वडवणी च्या जवळच आहे.. या सर्व स्थळांना भेटी देऊन येणारया पत्रकारांना पय॓टनाचया आनंद घेता येईल.
८ जून रोजी मुककामास येणारया पत्रकारांची निवास आणि भोजणाची व्यवस्था करण्यात आली आहे.. रात्री 11 पय॓तच जेवण उपलब्ध असेल..

मेळाव्यास राज्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येनं यावं असं आवाहन बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि वडवणी तालुका मराठी पत्रकार संघाने केले आहे…

LEAVE A REPLY